चंदगड कोवाड सेंटरसाठी सरपंच संघटनेकडून मदत स्विकारताना प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी व सरपंच संघटनेचे पदाधिकारी. |
चंदगड तालुका सरपंच संघटनेच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या सोयीसाठी कोरोना केअर सेंटरसाठी १०० कॉट व गादीची मदत आज पंचायत समितीसमोर प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे व गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांच्याकडे देण्यात आली.
सरपंच संघटनेकडून गेले किती दिवसापासून हॉस्पिटल उभे करण्याच्या उद्देशाने सरपंच संघटनेचे पदाधिकारी प्रयत्न करत होते त्या अनुषंगाने सरपंच संघटना अध्यक्ष सचिव खजिनदार व सदस्य सातत्याने प्रयत्न करत होते. आज चंदगड येथे पंचायत समिती पटांगणामध्ये प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांच्या उपस्थितीत 100 कॉट 100 गादी 100 उशी कोविड सेंटरसाठी मदत म्हणून देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला व ग्रामसेवक संघटनेचा ही सत्कार करण्यात आला. सरपंच संघटना पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच रामभाऊ पारसे, एकनाथ कांबळे, राजू पाटील, राजू पाटील, अमोल सुतार, डी. जे. नाईक, डी. एन. मोटूरे, श्रीधर भोगण, अशोक पाटील, माधुरी सावंत भोसले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment