आमरोळीतील अतिसाराच्या साथीने ग्रामस्थ हैराण, प्रांताधिकारी पांगारकर यांची भेट, डॉ. सोमजाळ यांच्या प्रयत्नांमूळे साथ आटोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

04 June 2020

आमरोळीतील अतिसाराच्या साथीने ग्रामस्थ हैराण, प्रांताधिकारी पांगारकर यांची भेट, डॉ. सोमजाळ यांच्या प्रयत्नांमूळे साथ आटोक्यात

आमरोळी (ता. चंदगड) येथे आलेल्या साथीबाबत भेट देवून माहीती घेताना प्रांताधिकारी विजया पांगारकर. उपस्थित मान्यवर.
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड 
          आमरोळी ता.चंदगड येथे गेले चार दिवस सूरू असलेली अतिसाराची  साथ आज आटोक्यात आली.अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ बी डी सोमजाळ याच्या वैद्यकीय पथकाने चार दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून हि साथ आटोक्यात आणली. दरम्यान आज प्रांताधिकारी विजया पांगारकर यानी आमरोळी गावाला भेट देऊन सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांना खडसावले.त्या म्हणाल्या आमरोळी गावात इतकी मोठी साथ आली असताना कोणीही याबाबत आपल्याला कळवले नाही.सर्वत्र कोरोनाची धास्ती,नजिकच्या आजरा तालूक्यात डेंग्युची साथ,हत्तीचे आक्रमण असताना देखील, येथील यंत्रणा इतकी सुस्त कशी,नशीब समजा या साथीत कोणीही ग्रामस्थ दगावला नाही.ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी पूरवठा करण्याकडे लक्ष द्यावे.गाव स्वच्छ करा, ग्रामस्थाना मास्क वापरायला भाग पाडा. सर्वांनी काळजी घ्या असे आवाहन केले. 
      आमरोळी ता . चंदगड येथे गेले चार दिवस सुरु असलेल्या अतिसाराच्या साथीने ग्रामस्थ हैराण झाले मात्र अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . बी . डी सोमजाल यांनी  आपल्या १५/२० सहकाऱ्यांसह गावात तळ ठोकून रूग्णावर उपचार केला व साथ आटोक्यात आणली यावेळी  चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे, सभापती अॅड अनंत कांबळे, तालुका वैद्यकीय आधिकारी डाॅ आर के खोत, गटविकास अधिकारी आर बी जोशी पाणी पुरवठा अभियंता ए एस सावळगी उपस्थित होते .वरिष्ठ अधिकारी गावात आले असताना ग्रामपंचायतीचा एक सदस्यही  फिरकलेला नाहीत. 

आमरोळी हे जवळपास ५००० लोकसंख्येचे गाव या गावाला शासनाकडून सन २००५ साली ५५ लाखाची जलस्वराज्य योजना पूर्णत्वास गेली तर सन २०१३-१४ साली ४८ लाखांची नव्याने नळपाणी योजना पूर्ण करण्यात आली शासनाकडून या गावासाठी १ कोटी ३ लाख रुपये शासनाने खर्च करण्यात आले तरीसुद्धा आमरोळी ग्रामस्थांना घटप्रभा नदीचे गढूळ पाणी गढूळ च प्यावे लागत आहे.


No comments:

Post a Comment