चंदगड तालुक्यातील लाॅकडाउनला नागरिकांचा 100% प्रतिसाद, बाजारपेठातून शुकशुकाट - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2020

चंदगड तालुक्यातील लाॅकडाउनला नागरिकांचा 100% प्रतिसाद, बाजारपेठातून शुकशुकाट

चंदगड शहरातील संभाजी चौकात असा कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 
चंदगड / प्रतिनिधी 
     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील जनतेनं लाॅकडाऊनला मनापासून पतिसाद दिला. लाॅकडाऊनच्या दुसुऱ्या दिवशीही प्रतिसाद देत कोरोनाला हद्दपार करण्याचा निश्चय केला आहे असे जाणवले आहे. कालच्या अहवालानुसार एकेचाळीस नवे पाँझिटिव्ह रूूग्ण चंदगड तालुक्यात मिळून आले. आजचा पाॅझिटिव्हचा वाढता  आलेख हा फार मोठा चिंताजनक बनत आहे.
चंदगड बाजारपेठेत असा शुकशुकाट होता. 
 त्यामुळे केवळ आणि केवळ आता शासनाच्या नियमांचे पालन करणे हे सर्वानाच आत्यावश्यक आहे. "घरी राहा,सुरक्षित राहा, पोलीस व प्रशासनाला सहकार्य करुन स्वतःचा व कुटुंबाचा विचार करावा असे म्हणणेच योग्य आहे. लाॅकडाउन च्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील  सर्वच ठिकाणी पोलीस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या निरक्षणाखाली पोलिसांनी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक दुचाकी, चारचाकी वहाण अनावश्यक फिरू नये, यासाठी दक्षतेने पोलिस दिवसभर तैनात होते. त्यामुळे तालुक्यातील महत्त्वाचे मार्ग दिवसभर निर्मनुष्य होते. सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. चंदगड शहरातील जनतेने सुरुवातीपासून  खुपच मनापासून लाॅकडाउन पाळले आहे.  त्यामुळे शहरात आतापर्यंत सर्व काही बरे आहे व हे सुदैव आहे. मात्र आताच्या परिस्थितीचा विचार केला तर सद्या चंदगड हे शहर चोहोबाजुने कोरोना ने वेढलेले आहे. चंदगड शेजारी असलेल्या आसगाव, नागवे, हिंडगाव व शिरगाव ही सर्व गावे चंदगड शहराला जवळपास आहेत. चंदगड शहरातील व्यवहार  कडक बंद ठेवण्याशिवाय आता पर्याय नाही. तसेच शहरातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या नियमातुन जावे हेच फायदेशीर ठरणार आहे. चंदगडवासीयांनी ऐक्याची अनेकदा उदाहरणे दाखवून दिली आहेत. कोरोना विरुद्ध आता माणसीकता निर्माण करणे आवश्यक आहे व ते शक्य आहे. चंदगड तालुक्यातील रोज वाढणारा कोरोनाचा आकडा चिंताजनक 
असल्याने तालुकावासीयांनी मनापासून कडक नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रभाव हळूहळू कमी होईल आता जे झाले ते यापूढे होवु नये ही दक्षता प्रत्येकांनी घेणे गरजेचे आहे. तरच तालुक्याचा कोरोनाचा वाढता आकडा आलेख कमी होईल.  चंदगड पोलीस  ठाण्याचे पो.निरिक्षक अशोक सातपुते यांनी ठाण्यातील तीस पोलीस, पंचेचाळीस होमगार्ड तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी  कार्यरत ठेवले आहेत. तालुक्यातील चंदगड व पाटणे फाटा येथे नाकाबंदी तर शिनोळी, कानूर, कोदाळी, दड्डी, होसुर येथे चेकपोस्ट कार्यरत केले आहेत. मलगेवाडी व तूर्केवाडी येथे तालुका चेकपोस्ट कार्यरत आहे.
                                          

No comments:

Post a Comment