तुर्केवाडी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव, बाजारपेठेत शुकशुकाट, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

तुर्केवाडी गावात अखेर कोरोनाचा शिरकाव, बाजारपेठेत शुकशुकाट, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

तुर्केवाडी येथील बाजारपेठेथ शुकशुकाट होता.
तुर्केवाडी (प्रतिनिधी)
     चंदगड तालुक्यातील कोरोनाचा कहर कायम असून आज (सोमवार) दुपारी ४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तुर्केवाडी गावात कोरोनाचा पिझिटिव्ह रुग्ण सापडला असून त्यामुळे संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. तर कोरोना बाधित सापडलेली गल्ली कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आली आहे.
      सोमवारी चंदगड तालुक्यातील ४१ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ३१२ वर गेली आहे. दररोज सापडणाऱ्या रुग्णसंख्येत दोन अंकी वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात सर्व रुग्ण हे स्थानिक संसर्गातून सापडत असून ही साखळी तोडणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तुर्केवाडीच्या गावकामगार पोलीस पाटील सौ. माधुरी कांबळे यांनी केले आहे.
                                                बाजारपेठेत शुकशुकाट
सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचे समजताच गावात शुकशुकाट पसरला. रविवारी माडवळे, सुपे या शेजारील गावात रुग्ण सापडल्याने तुर्केवाडी बाजार पेठेत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर ग्राम समितीकडून सक्त सूचना देऊन कारवाई करण्यात येत होती. तरीही नागरिकांकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास येत होते. आज अखेर कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांनी आता तरी घरीच राहून लॉकडावूनचे काटेकोर पालन करावे असे आवाहन सरपंच रुद्राप्पा तेली यांनी केले आहे. तर गावामध्ये अनावश्यक व विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ग्राम समितीकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच गावातील बँकेचे व्यवहार मर्यादित कर्मचारी घेऊन सुरू असून पॉझिटिव्ह रुग्ण सापडतच तेही बंद करण्यात आले आहेत.
                                  बातमीदार - महेश बसापुरे, तुर्केवाडी प्रतिनिधी

No comments:

Post a Comment