तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
चंदगड तालूक्यातील तांबूळवाडी गावात कोरोणाचा महा विस्फोट झाला असून आज दुपारी आलेल्या अहवालानुसार येथील १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चंदगड तालूक्यात खळबळ उडाली आहे .
या अगोदर दौलत कनेक्शन मुळे तांबूळवाडीत ४८ रुग्ण सापडले आहेत .आज पुन्हा १५ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या ६३ झाली आहे . गावचा विचार करता घरोघरी रुग्ण होतात की काय अशी भिती निर्माण झाली आहे . प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत असले तरी नागरिंकाकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे .नागरीकानी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे . आज दुपारच्या अहवालानुसार चंदगड तालूक्यात ४१ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तो पुढीलप्रमाणे -हलकर्णी -४ , किरमटेवाडी -२ , तांबूळवाडी -१५ , माणगाव -१ , धुमडेवाडी -४ , सत्तेवाडी -१ , कोकरे -१ , सुळे -१ , कडलगे बुद्रुक -१ , नांदुरे -१ , भोगोली -१ , आडूरे-१ ,तुर्केवाडी -१ , मौजे कार्वे-१ ,वाघोत्रे -१ , बसर्गे-१ , करंजगाव -१ , जेट्टेवाडी ( मजरे ) -१ , इनाम म्हाळुंगे -१ ,सडेगुडवळे -१.
No comments:
Post a Comment