सुळे येथील जवान अमृत मांगले यांचा झारखण्डमध्ये मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

सुळे येथील जवान अमृत मांगले यांचा झारखण्डमध्ये मृत्यू

जवान अमृत मांगले
आजरा - सी.एल. वृत्तसेवा
सुळे (ता. आजरा) येथील सुपुत्र  व भारतीय सैन्य दलातील जवान अमृत बच्चाराम मांगले (वय-38)यांचे झारखंड येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. निधनाची वार्ता समजताच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होते आहे. बारावीपर्येंतचे शिक्षण पूर्ण झालेवर सण 2000 साली ते सैन्यात भरती झाले. सध्या ते 119  असाल्ट रेजिमेंट मध्ये सेवा बजावत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. सेवेतील जवान मांगले यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

1 comment:

Post a Comment