तुर्केवाडी (प्रतिनिधी) :
चंदगड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असताना येथील उद्योगधंदे हे कोरोनाच्या फैलावला कारणीभूत ठरतायत की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यात दौलत कारखान्यातील संपर्कातून तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी तुर्केवाडी येथील अचल फॅक्टरीतील संशयितांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
तुर्केवाडी हे पंचक्रोशीतील बाजारपेठेचं गाव असून येथील अचल फॅक्टरीमध्ये अनेक महिला कामाला आहेत. तेथील एक कर्मचारी महिला ही कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर तिच्या संपर्कातील सर्वांचे स्वाब तपासणीला पाठवण्यात आले होते. अखेर या सर्व संशयितांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने मोठा धोका टळला असून दिलासा मिळाला आहे.
असे असले तरी दुसऱ्या बाजूला दौलत कनेक्शन काही थांबताना दिसत नाही. सोमवारी दुपारी आलेल्या अहवालानुसार तुर्केवाडीतील एक रुग्ण कोरोना बाधित सापडल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे. गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असून काही भाग सील करण्यात आला आहे. तरी ग्रामस्थांनी घरीच राहून नियमाचे काटेकोर पालन करावे, मास्क, सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावा आणि मुख्यतः कोणीही बाहेर पडून गर्दी करू नये असे आवाहन ग्राम दक्षता समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment