कानडीच्या या अनाथाना गरज आहे आपल्या आधाराची, मायबापा विना तीन लेकरं अनाथ - चंदगड लाईव्ह न्युज

21 July 2020

कानडीच्या या अनाथाना गरज आहे आपल्या आधाराची, मायबापा विना तीन लेकरं अनाथ

तेऊरवाडी (संजय पाटील)
        सर्वत्र कोरोना ने हाहाकार घातला असताना एक फार मोठे संकट नियतीने कानडी  (ता. चंदगड) येथील तीन मुलांवर टाकले आहे. येथीलअनिता,अमन, आदित्य यांचे मातृछत्र 11 जूलै 2020 रोजी हरपले आणि या अगोदरच पितृछत्र हरवलेली हि तिन्ही मूले आई - वडीला विना पोरकी झाली. या अनाथाना गरज आहे ती आपल्या मायेची, आपूलकीची आणि दानशूरतेची.
      कानडी येथील अशोक कांबळे यांचा झोपडीत का असेना पण खूप आनंदाने संसार चालू होता. पण या संसाराला दृष्ट लागली आणि अशोक यांचे सन २०१६ साली  निधन झाले. यानंतर  या मातेने फार कष्टाने या तिन्ही मुलांचा सांभाळ केला. मुळातच गरीब परिस्थिती असताना या आईने आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवले. मात्र जस जसे आईचे आजारपण सुरू झाले तस-तसे पोटाची खळगी भरण्यासाठी या मुलांची धडपड सुरू झाली.      
      सन  2016-17 अनिता नुकतीच दहावी च्या परीक्षेत 75% गुण मिळवून पास झाली होती. मात्र घराच्या अशा परिस्थितीत तिने सातवणे येथील  शाहू काजू फॅक्टरी मध्ये काजूची टलफरे काढण्यासाठीची दरमहा 4000/- रुपये पगाराची नोकरी पत्करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू ठेवला. आपलं शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून या मुलीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून आपले शिक्षण चालू ठेवले व गेल्यावर्षी 12 वी च्या परिक्षेमध्ये  65% गुण मिळवले.त्यानंतर आई लक्ष्मी आजारी पडल्या. नंतरमात्र घराची सर्व जबाबदारी एका अनितावर पडली आणि पुढील शिक्षणाला पूर्णविराम देऊन पूर्णवेळ फक्त कष्ट आणि कष्ट करत या बहीनेने आपल्या दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. ज्या वयात मुली कॉलेज मधले आयुष्य जगतात ,ज्या वयात आई वडिलांच्या जीवावर मौज करतात, त्याच वयात अनिता कुणाच्या शेतात भांगलन तर कधी फॅक्टरी मध्ये दिवसभर एक मजूर म्हणून काम करत होती.हे सर्व ऐकून  व पाहून  डोळ्यात आसवे आल्याशिवाय राहणार नाहीत.  कारण दुःख काय असत याच हुबेहूब दर्शन येथील या अनाथ  कुटुंबाला  भेट दिल्यानंतरच कळेल .खरच नियती एवढी कठोर होऊ शकते का? हा प्रश्न मनाला स्पर्ष करून जातो'  लॉकडवून नंतर फॅक्टरी बंद झाली आणि या मुलांच्या उदरनिर्वाह चे साधन बंद झाले. पण यावरही या ताईने मात करत मिळेल ते काम करून दिवसा 100 रुपये मजुरीवर गेले चार महिने आईचे आजारपण आणि भावंडे यांचा सांभाळ केला.  अस म्हणतात फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. कर्तव्याची व्याख्या अजून काय असू शकते?????ज्या वयात मुली संसार म्हणजे काय असतो ते शिकत असतात त्याच काळात या अनिता न आपल्या आजारी आई आणि आपली दोन लहान भावंडे यांचा सांभाळ करून संपूर्ण  संसाराचा गाडाचं एकहाती ओढून नेला .खरच धन्य ती माता जिने  अश्या कर्तृत्वाने आणि साहसी मुलीला जन्म दिला.
           याअगोदरच अमित देसाई,शिवराज देसाई व उमेश सुतार यांच्या आवाहना नंतर मदत सुरू झाली आहे. तरीही समाजातील दातृत्वाच्या सर्व हातानं पुन्हा एकदा नम्र विनंती या मुलांसाठी कोणत्याही स्वरूपाची मदत करा, जेणेकरून त्यांचे भविष्य आपल्या सर्वांच्या मदतीच्या हातानी सुरक्षित ठेवता येईल.जर कुणाला या मुलांसाठी खारीचा वाटा उचलायचा असल्यास त्यांनी खालील खात्यावर अथवा प्रत्यक्ष कानडी येथे भेटून मदत करावी.

(ANITA ASHOK KAMBLE
091210110016034
IFSC CODE-BKID0000912
BANK OF INDIA
BRANCH-CHANDGAD
Mobile-9130913664

No comments:

Post a Comment