कानडी येथील अनाथ मुलांना मिळणार आधार, अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी घेतली जबाबदारी, सी. एल. बातमीचा इफेक्ट - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2020

कानडी येथील अनाथ मुलांना मिळणार आधार, अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी घेतली जबाबदारी, सी. एल. बातमीचा इफेक्ट

कानडी (ता. चंदगड) येथील हिच ती अनाथ तीन मुले.
सी. एल. वृत्तसेवा, दौलत हलकर्णी 
कानडी (ता. चंदगड) येथील तीन मुले आई-वडिलांचे छत्र हरपल्याने पोरकी झाली आहेत. त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरातून मदत करण्याबाबतचे वृत्त सी. एल. न्युज या न्युज पोर्टलवर प्रसिध्द झाले. हि बातमी वाचून दौलत कारखाना चालवायला घेतलेले अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी या अनाथ मुलांची राहण्याची व मोठ्या मुलीला नोकरीची केल्याचे जाहीर केले आहे. त्यांना या अनाथ मुलांना जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे. 
        कानडी येथील या अनाथ मुलांच्याबाबत न्युज पोर्टल व सोशल मिडीयावरुही  हि माहीती अनेकांनापर्यंत पोहोचली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आज सर्वजन हताश होऊन बसलेत पण चंदगड तालुक्यातील नागरीकांची माणुसकी हताश झाली नाही. चंदगड लाईव्ह न्युजच्या माध्यमातुन कानडी येथील अनाथ मुलांची व्यथा सातासमुद्रापार पोहचली. त्यामुळे सर्वांनीच आपल्या पध्दतीने मदतीला प्रारंभ झाला. सर्वसामान्य व्यक्ती ते पोलिस कर्मचारी या सर्वांनीच आपल्या परीने मदत केली. कोरोनाच्या काळात हताश झालेल्या तालुक्यातील दातृत्त्वाचे हात मात्र हताश झाले नाहीत हे यावरूण दिसुन येते.
        या अनाथ बालकांची व्यथा सीएल न्युजच्या माध्यमातून अर्थव इंटरट्रेड प्रा. लि. लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना समजली. चंदगड तालुक्याची दौलतरूपी बुडती नाव चालवायला घेऊन खोराटे यांनी तालुक्याच्या विकासाला चालना दिली. मग आपण या अनाथ बालकांसाठी काय करू शकतो याचा विचार करुन त्यांनी लागलीस या अनाथ कुटुंबातील थोरली मुलगी अनिता व तिच्या लहानभावांचा उदरनिर्वाह व शिक्षणाची जबाबदारी पेलु शकेल. इतक्या पगाराची तीला झेपेल अशी नोकरी देणार असून दौलत वसाहतीमध्ये राहण्यासाठी घर देण्याचे जाहीर केले. यामुळे तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
         यावेळी सी. एल न्युजशी बोलताना चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले, " ज्यावेळी मी दौलत कारखाना चालवायला घेतला. त्याचवेळी मी या तालुक्याचा एक घटक बनलो आहे. दौलतच्या माध्यमातून मी आज सातशे ते आठशे कुटुंबाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे तालुक्यातील अशा गोष्टींना माझ्या परीने मी मदत करण्यास कदापी मागे हटणार नाही."2 comments:

Anil Yejare said...

Very good decision ,
Salute to kharate saheb.....

Anil Yejare said...

Khorate saheb...

Post a Comment