पाटणेफाटा येथे वास्तव्यास असणाऱ्या गरीब पंधरा कुटुंबाना शिधा वाटप करताना हवालदार डी एन पाटील. |
मजरे कार्वे / प्रतिनिधी सी एल न्यूज
पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील पोलीस चौकीतील हवालदार डी एन पाटील यांनी फाट्यावर राहणाऱ्या गरीबाना तांदूळ,साखर,चहा पावडर,साबण यासह लहान मुलांना चॉकलेट, बटर अशा कुटुंबाना शिधा वाटप केला.
पाटणे फाट्यावर लॉकडाऊन दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनधारकांच्यावर कारवाई केली जात आहे. येथील पोलीस चौकीतील हवालदार डी एन पाटील या बंदोबस्तात तैनात होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची चौकशी करत असताना त्यांचे लक्ष येथे फिरत असलेल्या गरीब कुटुंबातील महिला व मुलांकडे गेले. त्यांना विनाकारण घराबाहेर पडायचे नाही असे सांगत असताना त्यांना येथील अशी पंधरा कुटुंबे उपाशी आहेत हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ शिधा असलेली पंधरा पार्सल तयार केली व त्या कुटुंबाना पोहोच केली.यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणतात, आपण एक हवालदार यापेक्षा काय करू शकणार. अशा गरीब कुटुंबांकडे बघितले की मनाला खूप वेदना होतात. जेवढे म्हणून त्यांच्यासाठी काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकी बद्दल त्यांचे या परिसरात कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment