होसूर, शिनोळी आंतरराज्य सीमा नाक्यावर वाहनांना पुन्हा बंदी - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2020

होसूर, शिनोळी आंतरराज्य सीमा नाक्यावर वाहनांना पुन्हा बंदी


होसूर : आंतरराज्य सीमा नाक्यावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना बाधित रुगणांच्या आकडेवारी मुळे सध्या जिल्ह्यात 7 दिवसासाठी लॉकडाऊन सुरू आहे.चंदगड तालुक्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याची सीमा तालुक्यातील होसुर,शिनोळी बरोबरच अनेक गावांना लागून आहे.बेळगाव जिल्ह्यातून चंदगड तालुक्यात प्रवेश करणारे कोवाड व चंदगड हे प्रमुख मार्ग आहेत.वाढत्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलेल्या आदेशानुसार चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सिमेवरील होसूर तसेच शिनोळी या आंतरराज्य सीमा नाक्यावरून वाहनांना ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे सदर बंदी दिनांक 26 पर्यंत राहणार आहेत.
 चंदगड तालुक्यातून बेळगाव येथे नोकरीनिमित्त, व्यापारानिमित्त तसेच शैक्षणिक कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांची  संख्या ही लक्षणीय असून या सर्वांची  गैरसोय झाली आहे. सद्यस्थितीत चंदगड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुन्हा संसर्ग वाढू नये यासाठी सध्या सीमाभागासहित संपूर्ण तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील अनेक गावातुन बेळगावला जाणारे दूध  देखील बंद करण्यात आले आहे.




No comments:

Post a Comment