उमगाव : बंद असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र |
कागणी : सी एल न्यूज वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील उमगाव येथे काही वर्षापूर्वी आरोग्य उपकेंद्र उभारले आहे. पण ते केंद्र सुरुवातीपासून बंद असल्यामुळे येथील अनेक गावातील ग्रामस्थांना त्याचा लाभ घेता येत नाही. हा भाग अजूनही अप्रगत असून, जंगल, डोंगराळ परिसर आहे. यामुळे अनेक समस्या या ठिकाणी भेडसावत आहेत. दळणवळण, आरोग्य, मोबाईल नेटवर्क सुविधा नसल्यामुळे येथील लोकांचे जीवनमान सुधारले नाही, पण त्यातही हे आरोग्य उपकेंद्र काही वेळेपासून बंद असल्यामुळे लोकांना तालुक्याच्या ठिकाणी छोट्या-मोठ्या आजारांच्या कारणानिमित्तप्रवास करावा लागतो. मग हे केंद्र उभारलं तरी कशासाठी ? असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून होत आहे .
कोरोना विषाणू आणि इतर आजार अशी साथ असताना हे आरोग्य उपकेंद्र आठवड्यातून दोन दिवस सुरु होणे हे खूप गरजेचे आहे. उमगाव येथील उपकेंद्र सुरु झाल्यास अनेक गावचा आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागत . त्यामुळे एकंदरीत शासनाने यावर लक्ष घालून या भागातील आरोग्य केंद्र हे किमान आठवड्यातून दोन दिवस सुरु करून डॉक्टर सहित अन्य सोयी उपलब्ध व्हावे अशी मागणी स्वयंम जनसेवा फाउंडेशन अध्यक्ष चंद्रकांत गावडे, माजी सरपंच अशोक पेडणेकर, मुंबईचे पत्रकार ज्ञानेश्वर पाटील, मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धुरी यांच्यासह ग्रामस्थानी केली आहे.
No comments:
Post a Comment