तुर्केवाडी बाजारपेठ शंभर टक्के लोँँकडाऊन, गावातील काही भाग कंटेन्मेंट झोन घोषित - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2020

तुर्केवाडी बाजारपेठ शंभर टक्के लोँँकडाऊन, गावातील काही भाग कंटेन्मेंट झोन घोषित

लॉकडाऊन मुळे तुर्केवाडी बाजारपेठेत असा शुकशुकाट पसरला आहे.
मजरे कार्वे/ प्रतिनिधी सी एल न्यूज
          तुर्केवाडी (ता. चंदगड) ही या परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.दर बुधवारी येथे साप्ताहिक बाजार भरतो.बेळगाव नंतर येथे सगळ्यात मोठा जनावरांचा बाजार भरतो. गेल्या मार्च महिन्यापासून येथील आठवडा बाजार पूर्ण पणे बंद आहे. येथील कोरोना दक्षता कमिटीने नियोजन बद्ध गावात प्रभोधन केले. अजून पर्यंत येथे कोरोना ला शिरकाव करू दिला गेला नव्हता. 
      तुर्केवाडी गावात सोमवारी कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर गावातील गणपती गल्ली व आझाद गल्लीचा काही भाग हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून सील करण्यात आला आहे. 
       सोमवारी रात्री आणखी दहा संशयितांचे अहवाल हे निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांना आज घरी सोडण्यात आले असून होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असून कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी आणि इतर खबरदारीच्या सूचना  ध्वनी क्षेपकावरून देण्यात येत आहे.जिल्हाधीकारी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन व गावात आढळलेेला पॉझिटिव्ह रुग्ण यामुळे गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment