ढोलगरवाडी येथील नागपंचमी उत्सव व सर्प प्रदर्शन रद्द, कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2020

ढोलगरवाडी येथील नागपंचमी उत्सव व सर्प प्रदर्शन रद्द, कोरोना पार्श्वभूमीवर निर्णय

सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील, ढोलगरवाडी यांनी बसर्गे, ता. चंदगड येथे पकडलेला नाग (संग्रहित छायाचित्र).
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
 कोरोना महामारी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर  ढोलगरवाडी, ता. चंदगड येथे उद्या २५ जुलै रोजी नागपंचमी निमित्त होणारा उत्सव, सर्प प्रदर्शन व प्रबोधन कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती शेतकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन चौगुले व उपाध्यक्ष तथा सर्पोद्यान चे कार्यकारी संचालक तानाजी वाघमारे यांनी दिली आहे. यामुळे आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी  ६० वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा यावर्षी प्रथमच खंडित झाली आहे. नागपंचमी उत्सव रद्द करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील सर्व सर्प प्रेमी व भाविकांनी यावर्षी ढोलगरवाडीला येऊ नये असे आवाहन शेतकरी शिक्षण मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचेसह मामासाहेब लाड विद्यालय, वनविभाग व पोलीस ठाणे चंदगड यांच्यावतीने करण्यात आले आहे. गेल्या पंचावन्न वर्षात नागपंचमीनिमित्त होणारा सर्प प्रबोधन कार्यक्रम प्रथमच रद्द झाल्यामुळे सर्प प्रेमींत मात्र नाराजी पसरली आहे.

No comments:

Post a Comment