लेह सीमेवर लढणाऱ्या सैनिक पुत्राचा दहावी परीक्षेत झेंडा - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2020

लेह सीमेवर लढणाऱ्या सैनिक पुत्राचा दहावी परीक्षेत झेंडा

अमित नवले.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
      जम्मू-काश्मीरमधील लेह सीमेवर  तैनात असलेले सुभेदार मेजर अनिल नवले (शिरूर, ता. हवेली  पुणे) यांचा मुलगा अमित अनिल नवले यांने इयत्ता दहावी परीक्षेत इंग्लिश मेडियम मधून ९१ टक्के गुण मिळवत नेत्रदीपक यश प्राप्त केले.
      तो पुणे येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी असून त्याला आई रामेश्वरी व शाळेच्या प्राचार्या ज्ञान नॅन्सी पावस व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सुभेदार मेजर अनिल नवले देश रक्षणार्थ गेली अनेक वर्षे कुटुंबापासून दूर आहेत. तथापि अमित याने आपल्या अभ्यासू वृत्तीने एक मराठी सैनिकाचा मुलगाही इंग्रजी माध्यमातून मोठे यश संपादन करू शकतो हे दाखवून दिले आहे. यामुळे देश रक्षणार्थ सीमेवर शत्रु सैनिकांशी दोन हात करणाऱ्या सर्व सैनिकांच्या मुलांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment