नेसरी येथे पत्रकारांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती चा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2020

नेसरी येथे पत्रकारांच्या पुढाकाराने एक गाव एक गणपती चा निर्णय

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
          नेसरी पोलीस ठाणे (ता. गडहिंग्लज) येथे झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व गणेश मंडळ कार्यकर्ते यांच्या बैठकीत एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्याचे एकमताने ठरवण्यात आले. सहा. पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच आशिष साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय झाला. 
         या निर्णयlचे सर्वांनी स्वागत केले असून गावच्यादृष्टीने ही अभिमानाची गोष्ट असल्याचे भावना व्यक्त होत आहे. कोरोना विषाणू चा वाढता धोका व समूह  संसर्ग याचे लोण आता ग्रामीण भागात वाढू लागल्याने  गणेश उत्सव सोहळा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करूया, त्यासाठी पोलिस प्रशासन आपल्या पाठीशी आहे सर्वांच्या आरोग्य दृष्टीने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माने यांनी मांडले . त्याला गावातील सर्व आठ गणेश मंडळांनी होकार दिला. येथील बस स्थानकाजवळील प्रतापराव गुजर पुतळ्याशेजारी मूर्ती पूजन करण्याचे सर्वानुमते ठरले. सरपंच आशिश साखरे, उपसरपंच अमर हिडदुगी, माजी उपसरपंच .दयानंद नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार रविंद्र हीडदुगी व विनायक पाटील आदी पत्रकार मंडळीनी एक गाव एक गणपती या संकल्पनेसाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सदस्य रणजीत पाटील, विठ्ठल नाईक, विलास हल्ल्याळी, अमोल बागडी,  गोट्या हिडदुगी, प्रकाश मुरकुटे, श्यामकुमार नाईक दिग्विजय देसाई, आकाश दळवी यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना विषाणू संसर्ग व  प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर नेसरीतील गणेश मंडळांनी विचारपूर्वक एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली.  त्यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. वसंतराव पाटील (माजी सरपंच) कार्यवाह, नेसरी वाचन मंदिर

No comments:

Post a Comment