आजरा तालुक्यात कडक लॉकडाऊन, अनावश्यक फिरणाऱ्यांच्यावर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2020

आजरा तालुक्यात कडक लॉकडाऊन, अनावश्यक फिरणाऱ्यांच्यावर कारवाई

आजरा शहरात विनाकारण फिरणाऱ्याना असे बसवून ठेवले जात आहे 
आजरा - सी .एल. वृत्तसेवा
           आजरा तालुक्यात कडक लॉकडाउन पाळण्यात येत असून नागरिकांनीही यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे .लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर पोलीस,महसूल,स्थानिक ग्रामपंचायत व नगरपंचायत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विनाकारण,विनामास्क फिरणारे वाहनचालक, नागरिक यांचेवर कारवाई करणेत येत आहे. मुख्य बाजारपेठ वाहतुकीला बंद केली आहे .आठ दुचाकी,व एक चारचाकी वर कारवाई करणेत आली असून सदर वाहने जप्त केली आहेत. शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लॉकडाऊन साठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. जे विनाकारण फिरतात त्यांना चौकात बसवून त्यांचेवर गुन्हे दाखल करणेत येत आहेत.

No comments:

Post a Comment