मलगेवाडी चेक पोष्ट नाक्यावर वाहनांची तपासणी करताना कर्मचारी. |
गेल्या तीन महिण्यापासून चंदगड तालूक्यात अहोरात्र चालू असलेल्या चेक पोष्ट नाक्यावरील शिक्षकांच्या ड्यूट्या शुक्रवार २४ जुलै पासून बदलण्यात येत आहेत .
कोरोणाचा देशात प्रवेश झाला आणि २३ मार्च पासून लॉक डॉऊन जाहीर केले गेले. यानंतर ठिकठिकाणी चेकपोष्ट उभारण्यात आले. जिल्हयात येणाऱ्या सर्व गाडयांची तपासणी होऊ लागली. चंदगड तालूका सिमा भागात असत्याने येथे सात चेक पोष्ट प्रशासनाने उभारले. तेऊरवाडी, दड्डी, होसूर, शिनोळी, कोदाळी, कानूर व मलगेवाडी असे चेक पोष्ट उभारून शिक्षकांना या ठिकाणी ड्यूट्या देण्यात आल्या . सुरवातीला १२ तासांच्या दोन शिप्ट होत्या. यानंतर 8 तासांच्या तीन शिप्ट करून प्रत्येकी एका शिप्टला एका माध्यमिक व एका प्राथमिक शिक्षकांची नियूक्ती करण्यात आली आहे़. सोबतीला काही चेकपोस्टवर पोलिस व होमगार्ड देण्यात आले आहेत .एकदा चालू झालेली ड्यूटी १५ दिवसानंतर बदलण्यात येते. पण याची खात्री देता येत नाही. सध्या सकाळी ७ ते दुपारी ३, ३ ते राञी ९ व ९ ते सकाळी ७ अशा ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत. चेक नाक्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी, प्रवाशांची नोंद ठेवण्याचे काम या तपासणी पथकाला करावे लागते. तर तपासणी नाक्याव्यतिरिक्त काही शिक्षकांना कोरोना सर्वेक्षणाचे काम सलग तीन महिणे देण्यात आले आहे. त्यामूळे कोरोनाच्या या यूद्धात चंदगड तालूक्यातील शिक्षण विभाग अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment