आजरा -सी .एल. वृत्तसेवा
आजरा येथील तिघांविरोधात विनापरवाना बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करणाऱ्या मोहम्मद युनूस इमाम शेख (वय23,रा आझाद कॉलनी आजरा),मुस्तकीम इकबाल नाईकवाडे (वय 22),अजित आक्रम मुल्ला( वय 25),दोघेही रा. आंबोली रोड आजरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणेत आला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार प्रशांत पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास येथील सी. डि. फार्म येथे गाय वाहतूक करणारी मिनिडोअर पकडण्यात आली. यामध्ये तीन गायी व एक वासरू असल्याचे व या गायीची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे आजरा पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहतूक करणाऱ्यांकडे कोणताही वाहतूक परवाना नसलेने महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायदा 1976 चा दुरुस्ती अधिनियम 2015 चे कलम 5(अ),(ब )9 नुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे. पुढील तपास पो उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत. पोलिसांनी गायीची वाहतूक करणाऱ्या वाहनासह गायी ताब्यात घेतल्या आहेत.
No comments:
Post a Comment