महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2020

महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी

महानगर गणेशोत्सव महामंडळातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती साजरी झाली. यावेळी उपस्थित पदधिकारी.
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
     “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून तमाम भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यप्राप्ती साठी नवचेतना जागृत करणारे व सार्वजनिक गणपती उसत्वाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती 23 जुलै रोजी बेळगाव समादेवी गल्ली येथील  समादेवी मंगल कार्यालयात लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ बेळगावच्या वतीने साजरी करण्यात आली.
          महानगर गणेशोत्सव महामंडळ यांच्या वतीने गणेश उत्सावाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे  पदाधिकारी विरेश किडसनवर यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच यावेळी गणेश उत्सावाविषयी चर्चा करण्यात आली.
        यावेळी हेमंत हावळ बोलताना म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक  यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात रत्नागिरीच्या चिखली गावामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांनी अनेकदा आपल्या भाषणातून, लेखणीमधून तर प्रसंगी आंदोलनामधून ब्रिटीश सरकार विरूद्ध आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या. प्राणांची आहुती देऊन भारत देशाला ब्रिटीशांच्या जाचातून आपली मुक्तता करणार्‍या भारतमातेच्या सुपुत्रांपैकी एक असलेल्या बाळ गंगाधर टिळक यांना आज 164 व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली वाहली.
       अभिवादनात विरेश किडसनवर म्हणाले स्वातंत्र्य संग्रामाला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असा हुंकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. आपल्या विद्वत्तेने आणि प्रखर पत्रकारितेने लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे दिले. त्यासाठी अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांच्या त्याग,समर्पण आणि लढवय्येपणामुळे आपण आज समृद्ध, बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहू शकतो. लोकमान्य टिळक यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन!
              सुनिल जाधव यावेळी बोलताना,केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र  लोकमान्य टिळकांनी सुरू केली. दरम्यान 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' या अग्रलेखातून त्यांनी पुणे प्लेग साथीदरम्यान ब्रिटिशांनी अंमलात आणलेल्या प्लेग रोखण्यासाठी घरात घुसून फवरणी करण्याचा डाव मोडीत काढण्यासाठी जळजळीत अग्रलेख लिहीत ब्रिटीश सत्ताधिकार्‍यांना प्रश्न विचारला होता.
             देशभरात अनेक राज्यांत सार्वजनिक गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्रेरणा, देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. हा गणेशोत्सव चालू होण्यास लोकमान्यांची प्र्र्रेरणा कारणीभूत आहे.असे गजानन देवरमनी यांनी सांगितले.
         याप्रसंगी श्री सुनिल जाधव,अर्जुन रजपूत, हेमंत हावळ,गजानन देवरमनी, रवी कलघटगी,नितीन जाधव,प्रवीण पाटील, शरद पाटील, राजकुमार खटावकर, योगेश कलघटगी, राम घोरपडे, प्रवीण अगसगी, आदित्य पाटील,व अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment