![]() |
कानडी येथील अनाथाना गंगाई फौंन्डेशन कोवाड कडून मदत देताना सुरेश वांद्रे |
तेऊरवाडी - सी.एल. वृत्तसेवा
आईवडिलांचे मातृ- पितृ छ्त्र हरपल्याने अनाथ झालेल्या कानडी ( ता. चंदगड ) येथील अनिता, अमन आणि आदित्य याना कोवाडच्या गंगाई फौंन्डेशनचे प्रमूख सुरेश वांद्रे यानी जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम देवून मदतीचा हात दिला.
दोन दिवसा पूर्वी चंदगड लाईव्ह न्यूजने कानडी येथील अनाथाना मदतीची गरज अशी बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल समाजातील अनेक घटकानी घेतली. कोवाड येथील भाजपा शहराध्यक्ष व गंगाई फौंन्डेशनचे अध्यक्ष सुरेश वांद्रे यानी सर्व जीवनावश्यक वस्तू सोबत रोख रक्कमही या निराधाराना दिली.
आईच्या अपघाती मृत्यूनंतर आईच्या नावाने गंगाई फौंन्डेशन काढले असून याच्या माध्यमातून समाजातील अशा अनाथ, निराधार मूलांना मदत करून त्यांच्या जीवनात थोडा का असेना आनंद निर्माण करणार आहे. तसेच समाजातील अशा अनाथांच्या सुखदुःखात गंगाई फौंन्डेशन सदैव मदतीचा हात देणार असल्याचे सांगितले. यावेळी सुरेश वांद्रे यानी व्यक्त केला. यावेळी एस. के. पाटील, संजय पाटील, तातोबा पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment