गुडेवाडी (ता. चंदगड) येथे पाण्याच्या जॅकवेलमध्थे पडलेला नाग सापाला बाहेर काढून जिवदान देण्यात आले. |
कागणी : सी एल न्यूज वृत्तसेवा
शनिवारी सर्वत्र होणाऱ्या नागपंचमीच्या पूर्वसंध्येला वरगाव गुडेवाडी (ता. चंदगड) येथे जॅकवेल मध्ये पडलेल्या भल्या मोठ्या नागसापाला सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांनी पकडून जीवदान दिले.
वरगाव गुडेवाडी गावच्या पिण्याच्या पाण्यामध्ये (जॅकवेल) मध्ये प्रचंड मोठा नाग पडलेला होता. त्यामुळे गावात प्रचंड घबराट पसरलेली होती. शुक्रवारी दि. 24 रोजी दुपारी ढोलगरवाडी सर्पशाळेतील प्रा . सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी येथील डॉ. नामदेव कुट्रे, एल. पी. पाटील यांच्या मदतीने दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर तो पकडून ग्रामस्थांना नागपंचमीनिमित्त शास्त्रीय माहिती देऊन प्रबोधन केले. लॉकडाऊनमध्येही खऱ्या अर्थाने आमच्या गावची पर्यावरणपुरक नागपंचमीचा नायक नागाला पाण्यातून वाचवून शास्त्रीय माहितीसह नागपंचमी साजरी झाल्याबद्दल सदाशिव पाटील यांच्या सह डॉ. नामदेव कुट्रे, एल. पी. पाटील यांचे ग्रामस्थानी आभार मानले.
No comments:
Post a Comment