नांदवडे येथील भावेश्वरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल, पहिल्या पाचमध्ये मुलींची बाजी, आतापर्यंत सात वेळा शंभर टक्के निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

नांदवडे येथील भावेश्वरी विद्यालयाचा 100 टक्के निकाल, पहिल्या पाचमध्ये मुलींची बाजी, आतापर्यंत सात वेळा शंभर टक्के निकाल

नांदवडे विद्यालयाच्या प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या मुली
आदिती पाटील             ऋतुजा पाटील                   सुप्रिया पाटील 
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
             महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी ) परीक्षेचा नांदवडे (ता. चंदगड) येथील श्री भावेश्वरी विद्यालयाचा  निकाल १०० % लागला. यामध्ये विद्यालयातील ३३ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २३ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 
यात आदिती पाटील (९०.६० %), ऋतुजा पाटील (८९.८० %), सुप्रिया पाटील (८९.00 %), अंकिता गावडे (८८.८० %), तनुजा शिंदे (८७.८० %) हे पाच विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर. आय. पाटील, डी. एस. गावडे, व्ही. एन. कांबळे, सौ. एस. आर. कोरवी, पी. एम. कांबळे, के. एन. सावंत, सागर शिवनगेकर, पी. बी. नरी, टी. आर. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. खेडूत शिक्षण मंडळाचे सर्व सदस्य व शालेय समितीचे  प्रोत्साहन लाभले. विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्धल शालेय समितीचे चेअरमन एल. डी. कांबळे  सर्वांचे अभिनंदन केले.
                           सात वेळा शंभर टक्के निकाल
श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे या माध्यमिक शाळेने 2003-04, 2004-05, 2013-14, 2014-15, 2015-16, 2016-17, 2019-20 या वेळी 100% निकाल लागला आहे. यावर्षीही विद्द्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. 

No comments:

Post a Comment