प्रांताधिकारी विजया पांगारकरसह तहसिलदारांची हडलगेला भेट - आरोग्य यंत्रणेला केल्या विविध सूचना - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

प्रांताधिकारी विजया पांगारकरसह तहसिलदारांची हडलगेला भेट - आरोग्य यंत्रणेला केल्या विविध सूचना

प्रांताधिकारी विजया  पांगारकर व तहसिलदार दिनेश पारगे यानी हडलगे गावाला भेट देवून सूचना दिल्या
तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
         गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर यांनी हडलगे ( ता. गडहिंग्लज ) गावाला भेट देवून आरोग्य यंत्रणेला विविध सुचना केल्या .
         चंदगड तालूक्याच्या सिमेनजीक असणाऱ्या हडलगे गावामध्ये दौलत कनेक्शनमुळे कोरोना साखळी तयार होत आहे . या संदर्भात प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसिलदार दिनेश पारगे यांनी भेट दिली .यावेळी ज्या कुंटूबामध्ये कोरोणा बाधित रुग्ण सापडला होता त्या  घराना भेट देवून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने कोणात्या उपाय योजना केल्या आहेत याची पाहणी केली . तसेच सदर घरांचा परिसर सिल करण्याचा आदेश दिला . संपर्कात आलेल्या व्यक्तिंची तपासणी , औषध पुरवठा , आहार याकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याच बरोबर हडलगेच्या नागरिकानी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही प्रांताधिकारी पांगारकर यांनी केले . गडहिंग्लजचे तहसिलदार दिनेश पारगे बोलताना म्हणाले , सध्या गडहिंग्लज तालूक्यात रुग्ण संख्या वाढत आहे . नागरिकानी दक्ष रहाणे गरजेचे आहे . मास्क , सोशल डिस्टन्स राखून आरोग्यासंदर्भात काही प्रश्न निर्माण झाल्यास आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधन्याचे आवाहनही तहसिलदार श्री. पारगे यानी केले. यावेळी डॉक्टर, हडलगेचे तंटामुक्त अध्यक्ष विष्णू पाटील, पोलिस पाटील, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment