चंदगड तालुक्यात आज १८ तर शहरात सापडला तिसरा पाॅझिटीव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

चंदगड तालुक्यात आज १८ तर शहरात सापडला तिसरा पाॅझिटीव्ह

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज १८ पॉझिटीव्ह तर चंदगड शहरात दुसरा पाँझिटिव्ह रूग्ण सापडले.तालुक्यात सर्वांत मोठा हाॅटस्पाट ठरलेल्या तांबूळवाडी १५,चंदगड गांधीनगर १, दाटे १, हलकर्णी नवीन वसाहत १असे एकूण १८ नवीन रूग्ण सापडल्याची माहिती तालूका वैद्यकीय अधिकारी डाॅ.आर के खोत यानी दिली.आजच्या सापडलेल्या  रूग्णात दोन प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे
        चंदगड शहराच्या मंगळवारी रामदेव गल्लीत राहणाऱा एक व्यक्ती पाँझिटिव्ह निघाला आहे.तर आज बुधवारी गांधीनगर येथे एक युवक पाँझिटिव्ह सापडला आहे. यामुळे शहरातील लोकांना अतिसावधानता बाळगावी लागणार आहे   नगरपंचायत व आरोग्य विभाग तसेच संपूर्ण प्रशासनाने शहरात हा संसर्ग येवू नये यासाठी अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करत दक्षता घेतली होती. जानेवारी पासून संपूर्ण देश याबाबत दक्षता घेत आहे. आता पर्यंत चंदगड तालुक्यातील ठिक ठिकाणी कोरोना संसर्ग चे पाँझिटिव्ह सापडले आहेत तालुक्याचा हा पाँझिटिव्ह  आकडा आता चारशेह कडे जात आहे. मात्र आता पर्यंत चंदगड शहर आबादीत होते. ते चंदगड रामदेव गल्लीत एक पाँझिटिव्ह रूग्न सापडला.
             शहरातील रामदेव गल्ली, गुरूवार पेठ,व शिवाजी गल्ली हा भाग यापूर्वी पासून दक्षतेखाली आहे. पण शहरातील गांधीनगर येथे पाँझिटिव्ह सापडल्याने खळबळ माजली आहे. गडहिंग्लज विभागात गडहिंग्लज व आजरा ही दोन शहरे तसेच चंदगड या ठिकाणी कोणी पाँझिटिव्ह नव्हते  गडहिंग्लज व आजरा शहरा नंतर चंदगड शहरातही पाँझिटिव्ह सापडल्याने गडहिंग्लज विभागातील तीन्हीही तालुक्याची ठिकाणे आता पाँझिटिव्हवमध्ये आली आहेत. दाटीवटीत असलेल्या ठिकाणी पाँझिटिव्ह सापडल्याने तीन्हीही छोट्या शहराना पाँझिटिव्ह रुग्णामुळे अत्यंत दक्षतेखाली राहिल्याशिवाय पर्याय नाही. चंदगड येथील पाँझिटिव्ह कोणाच्या संपर्कात आला होता शिवाय तोसुध्दा कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याची आरोग्य विभाग माहिती घेत आहे.


No comments:

Post a Comment