सी. एल. ( चंदगड लाईव्ह) न्युज चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग 5 - चापडी - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

सी. एल. ( चंदगड लाईव्ह) न्युज चॅनेलच्या वाचकांसाठी सापांविषयी माहिती देणारी मालिका भाग 5 - चापडी

                                        चापडी 
सापाचे नाव :- चापडी / चापडा (bamboo pit viper) चापडी हा सुद्धा एक मंडली सर्प आहे. याचा रंग विशेषता फिक्कट हिरवा, पोपटी, निस्तेज हिरवा असतो त्यामुळे याला हिरवी चापडी किंवा हिरवा चापडा असे म्हणतात. तथापि याचा रंग तांबूस करडा, काळसर अशा विविध छटांत सुद्धा आढळतो. याच्या तोंडाजवळ दोन्ही बाजूला लहान छिद्रे असतात. पूर्ण वाढ झालेल्या या सापाची लांबी सरासरी अर्धा मीटर असते. घोणस, फुरसे प्रमाणे हा साप सुद्धा अंडी न घालता पिल्लांना जन्म देतो. हा जंगल तसेच जास्त झाडी असलेल्या ठिकाणी शक्यतो लहान झाडे, झुडपे तसेच वेलींवर राहतो. भारतात सर्वच भागात तुरळक प्रमाणात आढळणारा चापडी साप कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा तसेच सह्याद्री रांगांलगत पूर्वेकडील भागात जास्त प्रमाणात आढळतो. घोणस, फुरसे यांच्याप्रमाणेच चापडी च्या विषाचा परिणाम सुद्धा रक्ताभिसरण संस्थेवर होतो. दंशाच्या ठिकाणचे रक्त गोठू लागते, सूज येते आणि वेदना सुरू होतात. त्यामुळे या सापाला ओळखून रुग्णाला उपचारासाठी लवकरात लवकर इस्पितळात घेऊन जावे. झाडांवरील सर्व प्रकारचे कीटक, सरडे, बेडूक इत्यादी चापडी चे खाद्य आहे.

सौजन्य :-  प्रा. सदाशिव पाटील, सर्पशाळा प्रमुख ढोलगरवाडी व शेतकरी शिक्षण मंडळाचे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

आभार :-  तानाजी श. वाघमारे, उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक, सर्पोद्यान, ढोलगरवाडी.  

सहकार्य :- भरत द. पाटील, (निवृत्त वनअधिकारी DFO) कालकुंद्री-कोल्हापूर

                                                       *शब्दांकन* :- श्रीकांत वै. पाटील,* कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment