कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाचा १० वी परीक्षेचा १००% निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2020

कार्वे येथील महात्मा फुले विद्यालयाचा १० वी परीक्षेचा १००% निकाल


चंदगड/ प्रतिनिधी
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत महात्मा फुले विद्यालयाचा १००%निकाल लागला. परिक्षेला एकूण 86 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते . पैकी सर्व 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.23 विद्यार्थ्यानी 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त केले . विद्यालयात गुणानुक्रमे  मोहित जयंतीलाल पटेल ९७.४०%,समृध्दी शिवाजी पाटील९५.४०%, कु विद्या लक्ष्मण मुरकुटे९४%,कु मृणाली सतवा कोळसेकर ९३.४० व कु . स्वप्नाली शिवाजी यळळूरकर ९३%या विद्यार्थ्यांनी नंबर मिळविले  विद्यालयाने या वर्षीही उत्कृष्ठ निकालाची परंपरा जपली असून यशस्वी विद्यार्थी , पालक व शिक्षक यांचे परिसरात सर्वत्र कौतूक होत आहे . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महात्मा फुले विद्यालय व ज्युनि कॉलेजचे प्र प्राचार्य  . एस .वाय कुंभार, पर्यवेक्षक एल . जी पाटील  व सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे चेअरमन एम . एम . तुपारे यानी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment