भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी शिवाजी पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2020

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी शिवाजी पाटील यांची निवड

 
शिवाजी पाटील

सी. एल. वृत्तसेवा चंदगड
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे . माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांना निवडीचे पत्र दिले.
 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शिवाजी पाटील यांना निवडीचे पत्र देताना


 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असून आपल्या अनुभवाचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे ,असे प्रदेशाध्यक्ष आ . चंद्रकांत पाटील यांनी या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून मागील वर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती.सध्या शिवाजी पाटील हे भाजपापूरस्कृत माथाडी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष असून या माध्यमातून ते भाजपात  सक्रिय आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment