चंदगड तालुका हादरला, आज एकाच दिवशी 16 रुग्णांची भर, तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचली 138 वर - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2020

चंदगड तालुका हादरला, आज एकाच दिवशी 16 रुग्णांची भर, तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचली 138 वर

चंदगड / प्रतिनिधी
            चंदगड तालुक्यात कोरोनाचे संकट कमी होत असतानाच पावसाळ्यामध्ये स्थानिक लोकांना लागण होत असल्याने हे संकट आणखी गडद होत आहे. आज एकाच दिवशी चंदगड तालुक्यात 16 जण पाॅझिटीव्ह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तांबुळवाडी येथील पाॅझिटीव्ह रुण्णांच्या संपर्कातील कुटुंबातीलच अन्य अकरा जण पाॅझिटीव्ह आढळले आहेत. तर अशीच परिस्थिती कानूर बुद्रुक येथेही आहे. येथे एकाच कुटुंबातील पाच जण पाॅझिटीव्ह आले. त्याचबरोबर चंदगड शहरापासून जवळच असलेल्या मौजे शिरगाव येथे एकजण सापडल्याने चंदगडकरांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 138 वर गेली आहे. 
            चंदगड शहरात गेले दहा दिवस कडकडीत लाॅकडाऊन पाळण्यात आला होता. आज शुक्रवारी (ता. 10) हे लाॅकडाऊन उघडले. मात्र याच दिवशी तालुक्यात एकाच दिवशी 16 रुग्ण सापडल्याने चंदगडकरही चिंतेत सापडले आहेत. आठवडाभरापूर्वी तालुक्यातील सरपंच संघटनेने तालुका काही दिवस संपुर्ण कडकडीत लाॅकडाऊन करण्याची मागणी केली होती. ती योग्यच होती असे म्हणावे लागेल. त्यामुळे या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. कारण लाॅकडाऊन उघडल्यानंतर लोक यापुढे कधीही काहीही मिळणार नाही अशी धारणा करुन खरेदीसाठी बाहेर पडतात. यावेळी कोरोनापासून बचावाचे नियम धाब्यावर बसवले जातात हि वस्तुस्थिती आहे.  बाजारपेठेत तोंडाला मास्क न लावता अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसतात. स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरीकांनी स्वत:हून नियम पाळण्याची गरज आहे. अन्यथा परिणाम हे आपल्यालाच भोगावे लागणार हे मात्र नक्की.
           तांबुळवाडी व कानुर येथील पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले आहेत. हे कुटुंबातील लोक अन्य कोणाच्या संपर्कात आले आहेत का याचा शोध घेण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन स्वत:चा बचाव करावा. 


No comments:

Post a Comment