बेंटली फाऊंडेशन कडून सरस्वती विद्यालयाला 70 बेंच भेट - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2020

बेंटली फाऊंडेशन कडून सरस्वती विद्यालयाला 70 बेंच भेट

बेंटली फाउंडेशन इंडिया कडून बेंच चा स्वीकार करताना मुख्याध्यापक निर्मळकर, शिक्षक व शाळा कमिटी सदस्य आदी.
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
         श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री शाळेस बेंटली फाऊंडेशन इंडिया या जगप्रसिद्ध कंपनी  कडून भेट स्वरुपात 70 बेंच प्रदान करण्यात आले. खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्रीने चंदगड तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ कालकुंद्री येथून केली.  या शाळेने अनेक गुणवंत आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविले. आज या शाळेत सुसज्ज इमारती आणि प्रयोग शाळा उभ्या आहेत. येथे इयत्ता दहावी परीक्षा केंद्र आहे. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था लक्षात घेता बेंच ची कमतरता होती. बेंटली फाऊंडेशन इंडिया कंपनीने शाळेचा आढावा घेऊन याची पूर्तता केली.  याकामी विद्यालयाचे माजी विद्यार्थी, कागणी गावचे सुपुत्र  व मुरकुटे फर्निचर व स्टील वर्क कोल्हापूर चे मालक, उद्योजक शिवाजी रामचंद्र मुरकुटे यांचे सहकार्य लाभले. बेंच प्रदान प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी बी निर्मळकर, सर्व शिक्षक, शाळा कमिटी सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment