महालॅब मार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासण्या व्हाव्यात, कोविड १९ च्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2020

महालॅब मार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत तपासण्या व्हाव्यात, कोविड १९ च्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक संघटनेची मागणी


चंदगड / प्रतिनिधी
            कोविड १९ या आजाराबाबत समाजांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाश्वभूमीवर सर्व ५० वर्षावरील नागरिकांच्या तपासण्या महालॅब मार्फत मोफत व्हाव्यांत असे आदेश शासनाच्या आरोग्य विभागाने दिला आहेत. शासनाची महा लॅब (महाराष्ट्र शासनाची निःशुल्क प्रयोग शाळा) प्रयोग शाळेमार्फत सी. बी. सी मधुमेह रक्त चाचणी इत्यादि तपासण्या करण्यात येतात. त्यामुळे तालुक्यातील जेष्ठ नागरीकांच्या मोफत तपासण्या कराव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरीक महासंघ (फेस्कॉम) चे सहसचिव सोमनाथ गवस यांनी केली आहे. 
               सांगली जिल्हयात यासंबधी कार्यवाही सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण भागांत कांही दिवसापासून कोरोनाचा पादुर्भाव वाढत आहे पर जिल्ह्यातून तसेंच इतर ठिकाणाहून अनेक प्रवासी ग्रामीण भागांत येत आहेत त्यांच्या संपर्कात  मधुमेही  रक्तदाब  अस्थमा रुग्ण आल्यास संक्रमण लवकर होण्याची भिती आहे. त्यामुळे हाय रिस्क म्हणून संबोधित अशा ज्येष्ठ नागरिकांची तपासणी तालुका स्तरावरून ग्रामीण क्षेत्रांत व्हावी. या दृष्टीने कृती आराखडा तयार करून कार्यवाही करण्याचे आदेश महालॅब मार्फत सर्व आरोग्य यंत्रणेला देण्यात आले असल्याचे समजते. या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी संघटनेने केली आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळून वागल्यास  महालॅब मार्फत मिळणारी ही सेवा ग्रामीण भागांत खेड्यापाड्यांत पोहचणे साठी प्रयत्न व्हावेत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी मोफत करून जिल्हातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न झाल्यास भयमुक्त जीवन जगण्यासाठी दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण नियंत्रणांत राहणेस मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment