दाखल गुन्ह्यातील नाव काढून टाकण्यासाठी अडीच लाखाचा गंडा,गणेश फाटक याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2020

दाखल गुन्ह्यातील नाव काढून टाकण्यासाठी अडीच लाखाचा गंडा,गणेश फाटक याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

       
चंदगड/प्रतिनिधी:-
चंदगड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एका गून्ह्यातून नाव काढतो व जामिन मिळवून देतो असे सांगून दोघाकडून दोन लाख चाळीस हजार रूपये रक्कम उकळून ती देण्यास टाळाटाळ करून पैसे मागण्यार्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देणारा गणेश महादेव फाटक (रा.फाटकवाडी, सध्या राहणार चंदगड) याच्या वर आज चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.  फसवणूक झालेले अरूण मुकुंद दरेकर (रा.तडशिनहाळ)व मारूती जैनू गावडे (रा.माडवळे)यानी फाटक याच्या विरोधात चंदगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फाटक याला चंदगड पोलिसांनी अटक केली असून त्याला ४ दिवस  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश  चंदगड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जनआंदोलन कृती समितीने केली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली  अधिक माहिती अशी कि तूर्केवाडी ता.चंदगड येथील एका यूवकाला एका कारणावरून ९ऑक्टोबर २०१९रोजी किरकोळ माराहण झाली होती.या प्रकरणात अरूण दरेकर व अक्षय मारूती गावडे याच्यावर चंदगड पोलिसांत खोटा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून दोघांची नांवे काढतो माझी पोलिस अधिकार्यांशी खास ओळख आहे म्हणून अरूण याचेकडून दोन लाख व मारुती गावडे यांचे कडून चाळीस हजार रुपये रक्कम घेतली. पण गून्ह्यातून नांवे कमी न झालेने दोघांनीही फाटक याचे कडे पैशांची मागणी केली.पण फाटक याने पैसे देण्याऐवजी अश्लील   शिवीगाळ करून पैसे मागितला तर संपवून टाकिन व तूमच्या वरच खंडणीचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली.त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरूण दरेकर व मारूती गावडे यानी चंदगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.अधिक तपास पो नि.अशोक सातपुते करत आहेत.

 दरेकर याचा आत्महत्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानेच प्रकरणाला वाचा.
अरुण दरेकर हा बिन पगारी एका शाळेत शिक्षक आहे. एका प्रकरणात त्याला नाहक गोवण्यात आले. व अटक झाली होती. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्याच्या वडीलाने फाटक याला  गावातील अनेकांच्याकडून उसने घेऊन२लाख दिले होते. पैशाची मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने अरुण याने नदीच्या काठावर उभा राहून आत्महत्या करणार असा व्हिडीओ व्हायरल केला होता.  याची दखल घेत जनआंदोलन समितीने त्याला धीर देत एफ आय आर दाखल करण्यास सांगितले. आणि या प्रकरणाला वाचा फुटली.

   

No comments:

Post a Comment