प्रकल्पातील पाणी पातळीबाबत नदीकाठच्या नागरिकांना वेळच्यावेळी माहिती देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2020

प्रकल्पातील पाणी पातळीबाबत नदीकाठच्या नागरिकांना वेळच्यावेळी माहिती देण्याची मागणी


चंदगड / प्रतिनिधी:
        चंदगड तालुक्यातील प्रकल्पातील पाणी पातळी व सोडलेल्या पाण्याची माहिती दररोज प्रसारीत करावी. चंदगड तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे चार दिवस  मोठा पाऊस पडला की प्रकल्प भरतात व पाणी प्रकल्पाच्या सांडव्यातून नदी पात्रात जाते. पण ज्यावेळी अतिवृष्टी होते व महापूर येतो. त्यावेळी सांडव्यातील पाणी व पावसाच्या पाण्यामुळे माहापूर  गंभीर रूप धारण करतो. याचा फटका सर्व जनतेला बसतो. याकडे बारकाईने नजर ठेवून टप्या-टप्याने प्रकल्प भरतील यासाठी नियोजन करावे. दररोज सर्व प्रकल्पातील पाणी पातळी व सोडलेल्या पाण्याची माहिती  सोशल मिडीया व प्रसारमाध्यमातून  प्रसारित करावी अशी मागणी संदीप आर्दाळकर यांनी  तहसीलदार यांचेकडे केली आहे. 


No comments:

Post a Comment