चंदगड तालुक्यात संततधार पावसामुळे सहा बंधारे व तीन पूल पाण्याखाली, अनेक मार्ग बंद - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2020

चंदगड तालुक्यात संततधार पावसामुळे सहा बंधारे व तीन पूल पाण्याखाली, अनेक मार्ग बंद

करंजगाव (ता. चंदगड) येथील करंजगाव-नांदवडे मार्गावरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. 
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड 
गेले चार दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे चंदगड तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात 85.50 तर आतापर्यंत 692.17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे  पिळणी, भोगोली, गणुचीवाडी, कानडी, कोनेवाडी, अडकूर हे सहा बंधारे तर चंदगड, करंजगाव, हिंडगाव हे तीन पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. काल दिवसभरात तुडिये येथील संजय अनंत कुलकर्णी  यांच्या राहत्या घराची भिंत पडून तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
गेले चार दिवस संततधार पाऊस सुरु असल्याने नद्याच्या पाणीपातळीत वाढ होवून आज सकाळी तालुक्यातील प्रमुख घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन्ही नद्यांचे पात्र काही ठिकाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक मार्गावरील वाहतुक बंद आहे. आज दुपारनंतर पावसाने काहीशी उसंत दिली असली तरी पाणीपातळी जैसे थे आहे. 
      आजचा व आजपर्यंतचा चंदगड तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस
चंदगड 103 (751), नागनवाडी 36 (661), माणगांव 36 (158), कोवाड 58 (312), तुर्केवाडी 97 (591), हेरे 183 (1157) एकूण 513 मिलीमीटर तर तालुक्यामध्ये सरासरी 85.50 मिलीमीटर पाऊस झाला. 

              घटप्रभा मध्यम प्रकल्प - आजची स्थिती
पाणी पातळी – 743.80 मी.
एकूण पाणीसाठा – 47.789 द.ल.घ.मी / 1687.68 द.ल.घ.फू.  
टक्केवारी -  108.25%
मागील 24 तासातील पाऊस -   230 मी.मी.
1 जून 2020 पासून एकूण पाऊस –  1854 मी.मी.
सांडवा विसर्ग – 10890 क्युसेक्स .
विद्युतगृह विसर्ग - 450 क्युसेक्स.
सिंचन विमोचक विसर्ग  - 00 क्युसेक्स .
द्वार विसर्ग - 00  क्युसेक्स .
                                 मागील वर्षी या दिवशीची स्थिती
पाणी पातळी –  742.95 मी..
एकूण पाणीसाठा –  45.668 द.ल.घ.मी / 1612.77 द.ल.घ.फू.
पाणीसाठा टक्केवारी  -  103.45%
एकूण पाऊस - 1656मी.मी.  ( 2019 चा)

No comments:

Post a Comment