शशिकांत पेडणेकर |
चंदगड / प्रतिनिधी
आधुनिक भारत चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून सिनेक्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्काचे काम करण्यासाठी शशिकांत विलास पेडणेकर मुरकुटेवाडी (ता. चंदगड) गावचे सुपुत्र यांची संपर्कप्रमुख आधुनिक भारत चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली आहे.सुनिलजी खांबे राष्ट्रीय अध्यक्ष - आधुनिक भारत चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व विक्रमजी गायकवाड कार्याध्यक्ष आधुनिक भारत चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आले लवकरच सन्मान सोहळा राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडणार असल्याचे अधिकृत सूत्रांच्या कडून कळाले. या निवडीमुळे चंदगड तालुक्यातील तरुण कलाकारांना कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment