सांबरेतील गावठी दारू अड्डयावर नेसरी पोलिसांचा छापा - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2020

सांबरेतील गावठी दारू अड्डयावर नेसरी पोलिसांचा छापा


तेऊरवाडी / सी. एल. वृतसेवा
गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथील कुमरी रोड वरील गावठी दारू अड्ड्यावर नेसरी पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी 520 रुपये, प्लास्टिक केन, 10 लिटर हातभट्टीची दारू व काचेचा ग्लास जागीच उद्ध्वस्त करण्यात आले. संशयित आरोपी प्रेमा गणपती गुरव (वय-45) या पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत व झाडाझुडपांचा आडोसा घेत पळून गेल्या. त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 E प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद पो. कॉ. आनंदराव सखाराम देसाई यांनी दिली असून पुढील तपास पो .ना . अरुण पाटील करीत आहेत.

No comments:

Post a Comment