अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे २० माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2020

अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे २० माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती


अडकूर - सी . एल . वृत्तसेवा
         कोरोणाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे . सध्या शासनाच्या आरोग्य विभागाकडे मणुष्यबळ कमी पडत आहे . यासाठी अडकूर ( ता. चंदगड ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे २० माध्यमिक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधिकारी  डॉ .बी.डी. 
सोमजाळ यानी दिली आहे.
   अडकूर परिसर कारोना हॉट स्पॉट आहे . येथील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध सर्वेक्षण , उपाययोजना आखल्या जात आहेत . यासाठी माध्यमिक शिक्षकांची मदत घेण्यात येत आहे . यामध्ये श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर अडकूर , भावेश्वरी हायस्कूल आमरोळी , न्यू हायस्कूल उ अलबादेवी , श्री चाळोबा माध्यमिक विद्यालय सातवणे व संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथील माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे . या सर्वांना गुरूवार दि .९  जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र  अडकूर येथे वैद्यकिय अधिकारी डॉ .बी. डी . सोमजाळ प्रशिक्षण देणार आहेत.

No comments:

Post a Comment