कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री ता. चंदगड येथील शुक्रवार दि. १७ जुलै रोजी होणारी वार्षिक विरदेव यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांसह गावातील बाहेरगावी दिलेल्या माहेरवाशिणी मुली व त्यांच्या कुटुंबियांची श्रद्धा असलेल्या वीरदेवची यात्रा कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत कालकुंद्री व बिरदेव यात्रा कमिटी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. या दिवशी पाहूणे मंडळींसह कोणीही कालकुंद्री गावात येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment