केंचेवाडी येथील सौरभ पाटील याला मेदुवरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2020

केंचेवाडी येथील सौरभ पाटील याला मेदुवरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज

कु.सौरभ पाटील
अडकूर- सी .एल. वृत्तसेवा
        केंचेवाडी (ता. चंदगड) येथील दिनकर हरी पाटील यांचा मुलगा कु. सौरभ दिनकर पाटील याचे मेंदूत रक्तस्त्राव होत असलेने त्याला मुंबई येथील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे आठ दिवसापासून त्याचेवर सदर रुग्णालयात उपचार सुरु आहेत मात्र याकरिता अंदाजे चार लाख रुपये खर्च येणार असल्याचे रुग्णालयाने सांगितले मात्र पाटील यांची परिस्थिती सामान्य असल्याची दखल घेत येथील पुणे स्थित इंजिनीअर बॉईज ग्रुप व मित्र परिवाराने उपचाराकरिता 50 ते 60 हजाराची भरघोस आर्थिक मदत केली असल्याचे नंदकुमार नांदवडे यांनी सांगितले त्यामुळे या ग्रुप चे या परिवाराने आभार मानले आहेत गावातील सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रम असो,किंवा अडचणीचा प्रसंग असो किंवा शैक्षणिक मदत असो या ग्रुप ने नेहमीच सहकार्य केले आहे.


No comments:

Post a Comment