चोरीला गेलेला ट्रॅक्टर काही तासातच कोवाड पोलिसानी शोधला, आरोपीच्या आहेत शोधात - चंदगड लाईव्ह न्युज

15 July 2020

चोरीला गेलेला ट्रॅक्टर काही तासातच कोवाड पोलिसानी शोधला, आरोपीच्या आहेत शोधात

चोरीला गेलेल्या ट्रॅक्टर सोबत पीएसआय हणमंत नाईक व कर्मचारी.
कोवाड - सीएल वृत्तसेवा
       लाकूरवाडी ( ता. चंदगड ) येथून काल चोरीला गेलेला ट्रॅक्टर आज गुन्हा नोंद झाल्यानंतर काही तासातच कोवाड पोलीसानी कारवाई करत चोरीला गेलेला ट्रॅक्टर तडशिनहाळ ( ता. चंदगड ) येथून हस्तगत केला .
     अधिक माहिती अशी लाकूरवाडी येथील रामचंद्र बसवंत पाटील या शेतकऱ्याने नविनच महिंद्रा कंपनिचा ६ लाख ५० हजार रूपये किमतीचा ट्रॅक्टर बेतला होता . हा ट्रॅक्टर तुकाराम तुपारे यांच्या गॅरेजमध्ये लावला होता . पण रात्रीच्या सुमारास अज्ञाताने या ट्रॅक्टरची चोरी केली . आज दुपारी या संदर्भात चंदगड पोलिसात भां . द .वि.स. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता .यानुसार पोलिस निरिक्षक  सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय हणमंत नाईक, पो .ना. साबळे आदिनी तात्काळ सुत्रे हलवून तडशिनहाळ येथून ट्रॅक्टर हस्तगत केला .आरोपीचा शोध चालू आहे . या घटनेचा अधिक तपास कोवाड पोलिस करत आहेत.

एका आठवडयातच कोवाड परिसरातील चोरीला गेलेल्या तीन ट्रॅक्टर चोरींचा छडा कोवाड पोलिसानी लावला असून दोन आरोपिना अटक केली आहे . याबद्द्ल कोवाड पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment