हवालदार डी. एन. पाटील कानडी येथील अनाथ मुलांना मदत देताना, शेजारी इतर.
|
पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार डी एन पाटील यांनी कानडी गावातील कांबळे कुटुंबातील तीन लहान मुलांना मायेचा आधार देत आपलंसं केलं. आज प्रत्यक्ष भेट देवून घरातील लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू व या तीन्ही मुलांना रोजच्या वापरातील कपडे देवून वर्दीच्याही पलीकडे जावून पोलीस, समाजातील गरीब अनाथ मुलांना जगण्याचे पाठबळ कशा प्रकारे देवू शकतात याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला व खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. येथून पुढे लागणाऱ्या प्रत्येक मदतीसाठी आपण सदैव तयार असल्याचे ही आश्वासन या मुलांना देवून दुःखातून सावरून जगण्याची नवीन ऊर्जा या मुलांमध्ये निर्माण केली आहे. हवालदार पाटील यांनी राबविलेल्या या उपक्रमाबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment