चंदगड तालुक्यात आज सहा रुग्णांची भर, स्थानिक संसर्गामुळे धोका वाढला, रुग्णसंख्या 160 वर - चंदगड लाईव्ह न्युज

14 July 2020

चंदगड तालुक्यात आज सहा रुग्णांची भर, स्थानिक संसर्गामुळे धोका वाढला, रुग्णसंख्या 160 वर

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड 
         चंदगड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यातच आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या रिपोर्टनुसार आज चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथे चार, होसुर येथे एक व कुदनुर येथे एक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे स्थानिकांना धोका वाढला असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 
   काल चंदगड तालुक्यातील रुग्णसंख्या 154 होती. आज त्यात सहा रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत 160 रुग्ण झाले आहेत. यातील निम्याहून अधिक रुग्ण उपचारअंती बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे हि आकडेवारी आणखी कमी येवू शकते. तालुक्यात तांबुळवाडी येथे सर्वांधिक रुग्ण आढळल्याने गावात भितीचे वातावरण आहे. 

No comments:

Post a Comment