पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून चंदगड नगरपंचायतीला सॅनिटायझर मशीन देण्यात आली. याप्रसंगी उपस्थित नगरपंचायतीचे नगराध्यक्षा व नगरसेवक. |
सी. एल. वृत्तसेवा, चंदगड
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना संसर्गाच्या महामारी पासून नागरिकांना वाचवण्यासाठी राज्यपातळीवर सध्या मोठया प्रमाणात प्रशासनाचे काम सुरू आहे. या भयानक परिस्थितीला आरोग्य अधिकारी कर्मचारी पोलिस खाते व महसूल खाते या परिस्थितीला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी मदतीचा हात म्हणून चंदगड नगरपंचायतीला पालकमंत्री सतेज पाटील यांनी नगरपंचायत नगरसेवक यांच्याकडे सॅनेट्रायजर मशीन देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा प्राची कानेकर, नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर ,बांधकाम सभापती अभी गुरबे,उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,नगरसेवक झाकीर नाईक ,मेहताब नाईक,नगरसेविका संजीवनी चंदगडकर ,नेत्रदीप कांबळे ,ममताज बी मदार ,माधुरी कुंभार ,अनुसया दाणी, अनिता परीट, रोहित वाटंगी, मुख्याधिकारी अभिजित जगताप, प्रशासन अधिकारी सचिन शिंदे व कर्मचारी यांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment