लक्ष्मण रवळू पाटील पार्वती लक्ष्मण पाटील |
कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथे पतीच्या जाचाला कंटाळून वृध्द पत्नीने पतीच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवले व नंतर पत्नीने स्वत: च्या अंगावरही राॅकेल ओतून पेटवून घेतल्याने यामध्ये दोघा वृध्द नवरा बायकोचा जागीच मृत्यू झाला. हि घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मण रवळू पाटील (वय ९०) व पार्वती लक्ष्मण पाटील (वय ८५) असे मृत नवरा बायकोचे नाव आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत पती-पत्नी काही वर्षांपासून आपल्या घरात दोघेच राहत होते. त्यांची दोन मुले दुसऱ्या घरी विभक्त होती. आज सकाळी मुलगा पुंडलिक हे जनावरांचे दूध काढण्यासाठी आई वडिलांच्या घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे आईने दरवाजा उघडला नाही.दररोज एका हाकेत दरवाजा उघडणारी आई हाकेला प्रतिसाद देत नसल्याने मूलगा पुंडलिक याने शेजारच्या काही जणांना बोलावून दरवाजा मोडून काढला. यावेळी वृध्द दांपत्य जळालेल्या स्थितीत जमिनीवर अस्ताव्यस्त पडल्याचे आढळले. लक्ष्मण हे चार वर्षांपासून आजारी होते. त्यांची शुश्रुषा पत्नी पार्वती या करत होत्या. दोघांमध्ये सतत वाद होत होता. पार्वती या लक्ष्मण यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. पहिल्या व दुसऱ्या पत्नीची दोन्ही मुले स्वतंत्र राहत होती.रोजच्या आजारपणाला लक्ष्मण हे वैतागले होते. त्यांची पत्नी पार्वती याही शुश्रुषेला वैतागल्या होत्या. त्यामुळे सोमवारी पहाटे पत्नी पार्वती हिने बाटलीतील रॉकेल पतीच्या अंगावर ओतून पेटवले व नंतर स्वताच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेतले यात दोघांचाही गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. पुंडलिक लक्ष्मण पाटील यानी चंदगड पोलिसाना वर्दी दिली.दरम्यान पतीच्या खूनाला जबाबदार धरून पत्नी पार्वती हिच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख श्रीनिवास घाटगे यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची चंदगड पोलिस ठाण्यात नोंद असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हणमंत नाईक करत आहेत. वृध्द दांपत्याच्या पश्चात दोन मुलगे, पाच मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment