तेऊरवाडीच्या बहीण -भावाचे सीबीएसई बोर्ड परिक्षेत उज्वल यश - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

तेऊरवाडीच्या बहीण -भावाचे सीबीएसई बोर्ड परिक्षेत उज्वल यश

                                 प्राजक्ता गडकरी                      प्रथमेश गडकरी                                  
तेऊरवाडी - सी. एल. वृत्तसेवा
      नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय बोर्ड ( CBSE ) परिक्षेमध्ये तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील बहिण -भावाने उज्वल यश संपादन केले.
     इयत्ता १०वी सीबीएस बोर्ड दिल्लीची, केंद्रीय विद्यालय भूवनेश्र्वर ( ओडिसा ) मधून कु . प्राजक्ता पांडूरंग गडकरी हिने ८७ .४ % गुण मिळवले . तर प्रथमेश पांडूरंग गडकरी याने १२ वी वाणिज्य शाखेत याच दिल्ली बोर्ड मधून  ८३ .२ % गुण मिळवले. सैन्यदलात वडील असलेल्या या बहिण - भावाने आपणही उच्च शिक्षण घेऊन सैन्यदलात जाणार असल्याचे मनोगत व्यक्त केले . त्यांच्या या यशाबद्दल तेऊरवाडी ग्रामस्थानी अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment