कोवाड जुनियर कॉलेजचा निकाल 98 टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

कोवाड जुनियर कॉलेजचा निकाल 98 टक्के

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
         कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीमान व्ही पी देसाई ज्युनिअर कॉलेज चा इयत्ता बारावी विज्ञान  विज्ञान शाखेचा निकाल 98.84 टक्के लागला. कला शाखेचा निकाल 81.98 टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल 97.45  टक्के  लागला. 
          गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे विज्ञान शाखा- अश्विनी विठ्ठल मुतकेकर 80.15, तेजस श्रीकांत पाटील 78.92, रसिका संजीव आळवणे 77.84, कला शाखा- महादेवी तानाजी नाईक 77.07, भाग्यश्री प्रभाकर पाटील 76, साक्षी गावडू पाटील 75 .69 टक्के, वाणिज्य शाखा- पूजा सातेरी पाटील  86.00, सुशांत गुरुलिंग हळीज्वाळे 84.15, करिश्मा गणपती जाधव 83.23 टक्के. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य ए एस पाटील व सर्व  शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment