चंदगड तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीवर होणार प्रशासक नियुक्त, ऑगस्ट महिन्यात संपणार मुदत - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

चंदगड तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीवर होणार प्रशासक नियुक्त, ऑगस्ट महिन्यात संपणार मुदत


चंदगड / प्रतिनिधी 
      चंदगड तालुक्यात ४० ग्रामपंचायतीच्या मुदती ऑगस्ट महिन्यात संपणार असून त्या ग्रामपंचायतीवर जि. प. सीईओ एका प्रतिष्ठीत व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करणार आहेत.
    चंदगड तालुक्यातील बसर्गे, बागिलगे, बोंजुर्डी, दाटे, दिडलकोप, धुमडेवाडी, हजगोळी, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, किटवाड, म्हाळेवाडी, मलतवाडी, मुगळी, नागवे, नांदबड़े, राजगोळी बुद्रुक, सुंडी, सुस्ते, शिनोळी खुर्द, तुडये, आसगाव, बुक्कीहाळ, देवरवाडी, घुल्लेवाडी, वाळकुळी केरवडे, किणी, माङबळे, तावरेवाडी, हलकर्णी, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, होसूर कालकुंद्री, कौलगे, कोवाड, पाटणे पंद्रा आणि जांबरे या ग्रामपंचायतीच्या मुदत ऑगस्टमध्ये संपत आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै ऑगस्टमध्ये अपेक्षित होत्या. परंतु, कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक नेमला जाणार आहे.

No comments:

Post a Comment