अडकूर नंतर तांबूळवाडी बनतोय कोरोना हॉटस्पॉट - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

अडकूर नंतर तांबूळवाडी बनतोय कोरोना हॉटस्पॉट

कोरोना हॉट स्पॉट बनलेले तांबूळवाडी गाव
कोवाड - सी .एल. वृत्तसेवा
          संपूर्ण कोल्हापूर जिल्हयासह चंदगड तालूक्यातील वाढत्या स्थानिक रुग्णांच्या आकडेवारीमुळे प्रशासनाच्या चितेत भर पडली आहे . स्थानिक रुग्णांच्या आकडेवारीमध्ये जिल्हयात चंदगड तालूका अग्रस्थानी आला असून ही बाब तालूकावासींयासाठी निश्चितच गौरवशाली नाही . सध्या तर अडकूर हॉट स्पॉट नियंत्रणात आला असला तरी तांबूळवाडी कोरोना हॉट स्पॉट तयार झाला असल्याने प्रशासन चिंताग्रस्त बनले आहे.आज एक दिवसात चंदगडमध्ये 27 जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आला असून कोरोनाचा हॉट स्पॉट ठरलेल्या तांबुळवाडी गावात आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आणखी 15 जणांचे अहवाल पोजिटिव्ह आले आहेत.त्याबरोबरच कडलगे -1, हलकर्णी -1, सडेगुडवळे -1, जटेवाडी- 2, शिरगाव -1, सातवणे- 2,भोगोली -1, सुरुते -1,लाकुडवाडी -1, मलतवाडी -1 अशी उर्वरित रुग्णांची गावे असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर .के. खोत यांनी दिली आहे.
            सध्या चंदगड तालूक्यात  209 इतके कोरोना रुग्ण आसून 94 जण चंदगड कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत तर 8 जण सीपीआर मध्ये ऍडमिट आहेत.इतर बाकीच्या रुग्णाणा डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज वर सापडलेल्या रुगणांपैकी सर्वाधिक 48 रुग्ण एका तांबूळवाडीत असल्याने हे गाव कोरोनाचा हॉट स्पॉट बनला असला तरी इतकी संख्या केवळ दौलत कनेक्शनमुळे वाढली आहे . तांबूळवाडी गाव लॉक डाऊन असले तरी अजूनही येथील ग्रामस्थांचा शेजारच्या गावांशी संपर्क चालू आहे . त्यामूळे येथे अजूनही धोका आहे . ज्याप्रमाणे अडकूरमध्ये कडक लॉक डाऊन ,रोज सर्वे करण्यात आला तसेच येथे सुद्धा नियोजन असणे गरजेचे आहे . प्रशासन व नागरिकांना योग्य ती खबरदारी नाही घेतली तर तांबूळवाडीसह शेजारच्या गावानाही कोरोनाचा विळखा पडायला वेळ लागणार नाही.चंदगड तालुक्यातील एकूण रुग्णाची संख्या ही आतापर्यंतची कोल्हापूर जिल्ह्यातील रुगणांच्या संख्येच्या तुलनेत पहिल्या क्रमांकावर गेली आहे तरी देखील चंदगड करांचा वावर अगदी बिनधास्त चालू असलेला दिसत आहे .सोशल डिस्टनसिंग चा वापर न करता गावोगावी दुकानात दूध डेअरी,स्टँड,देवळे,बाजारपेठ याठिकाणी गर्दी करून मैफिली रंगताना दिसत आहेत.144 कलम लागू असताना देखील बाईक वरून अगदी तीन तीन जण मास्कचा वापर न करता अगदी मोकाट फिरत आहेत .गर्दीच्या ठिकाणी मला काय होतंय असं म्हणत मास्क चा वापर न करता वावर सुरूच आहे त्यासाठी मान. जिल्ह्या लधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसीलदार यांच्या सूचनेनुसार सहा भरारी पथक तैनात केली आहेत.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई होणार असल्याचे माहिती चंदगड चे तहसीलदार विनोद रणावरे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment