चंदगड मधील धरणे सरासरी ८० टक्के भरली; पावसाची सरासरी ७८८ टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

चंदगड मधील धरणे सरासरी ८० टक्के भरली; पावसाची सरासरी ७८८ टक्के


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
  चंदगड तालुका पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालय चंदगड यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तीन मध्यम व १६ लघुपाटबंधारे  प्रकल्प ८०.५८ टक्के भरले असून पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातील घटप्रभा- फाटकवाडी व झांबरे-उमगाव हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून जंगमहट्टी ५८.१८ टक्के भरला आहे. लघुपाटबंधारे पैकी कळसगादे व सुंडी प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित लघुपाटबंधारे प्रकल्पापैकी आंबेवाडी- ७९.९५, दिंडलकोप-६८.०९, हेरे-६०.८८, जेलुगडे-९०.८८, करंजगाव-४२.०६, खडक ओहोळ-३२.६०, किटवाड नंबर १- ६३.०८, किटवाड नंबर २- ६५.६६, लकीकट्टे-८७.६२, निटुर नंबर १- ४७.४९, निटुर नं. २- ४५.८४, पाटणे-९०.७७,  काजिर्णे-८४.३२ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
तालुक्यात पावसाचा जोर अधिक नसला तरी सातत्य टिकून आहे. शुक्रवार सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासात चंदगड तालुक्यातील विभाग निहाय झालेला पाऊस, कंसात एक जून पासून चा पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. चंदगड १४ (९८५), नागणवाडी ११ (८०३),  माणगाव ५ (२२४), कोवाड १० (४०८),  तुर्केवाडी ९ (७८०), हेरे २६ (१५३३), चोवीस तासातील एकूण पाऊस ७५ तर सरासरी पाऊस १२.५० मी मी. झाला आहे. आज अखेर तालुक्यातील एकूण पाऊस ४७३३ तर सरासरी पाऊस ७८८ मिलिमीटर इतका झाला आहे. यंदा पावसाची सर्वात कमी सरासरी माणगाव विभागाची आहे.

No comments:

Post a Comment