हलकर्णी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना ' शिवाजी विद्यापिठ गुणवत्ता ' शिष्यवृत्ती प्राप्त - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2020

हलकर्णी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना ' शिवाजी विद्यापिठ गुणवत्ता ' शिष्यवृत्ती प्राप्तदौलत हलकर्णी
        हलकर्णी (ता.चंदगड ) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तिन विद्यार्थ्याना 2019 - 20 या शैक्षणिक वर्षातील शिवाजी विद्यापिठ कोल्हापुरमार्फत दिल्या जाणाऱ्या ' शिवाजी विद्यापिठ गुणवत्ता ' शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
         कु. प्रियंका रवळु बोंद्रे बी.ए. 1(रा. ढेकोळीवाडी), कु. मयुरी जोतीबा ओऊळकर बी.ए. 1 (रा.तुर्केवाडी ) आणि कु.ऋषीकेश धाकलु घोळसे बी.एस्सी 1 ( राजगोळी ) या तिन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रु. शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
           शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल गवळी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख प्रा. मधुकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटिल, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटिल, सचिव विशाल पाटिल आदिंनी केले व त्याच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment